Cibil Score Check : तुमचा सिबिल स्कोर आता घर बसल्या मोबाईल वरून चेक करता येणार, अशा पद्धतीने करा सिबिल स्कोर चेक

सिबिल स्कोर आता घरबसल्या चेक करता येणार आहे, वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये आता बदल होत चाललेले आहे व यातच आता सिबील स्कोर चेक करणे अत्यंत सोपे झालेले आहे, कोणत्याही बँकेमध्ये कर्ज काढताना अर्जदाराचा सिबील स्कोर चेक करण्यात येतो, जर सिबील स्कोर चांगला असेल,तर त्याला चांगल्या प्रमाणात कर्ज दिले जाते आणि जर अर्जदाराचा सिबील स्कोर डाउन असेल,तर मात्र त्याच्यासमोर अडचणी उभ्या होतात.

त्यामुळे तुमचा सिबील स्कोर काय आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवे, जर सिबिल स्कोर 750 च्या वर असेल तर तो उत्तम समजला जातो, परंतु तो जर कमी असेल तर मात्र अडचणी निर्माण होतात. हा सिबिल स्कोर तुम्ही आतापर्यंत बँकेमध्ये केलेल्या कामांवर अवलंबून असतो किंवा, आतापर्यंत कोणते कर्ज काढले आहेत का, किंवा फेडण्यासाठी किती वेळ लागला, फेडले की नाही, एवढेच नव्हे तर इतर अनेक गोष्टींवरून सिबिल स्कोर ठरवण्यात येत असतो.

व आता तुम्हाला अगदी सहजरीत्या मोबाईल वरून तुमचा सिबील स्कोर चेक करता येणार आहे, कारण एसबीआय बँके अंतर्गत सिबिल स्कोर चेक करण्यासाठी पोर्टल चालू करण्यात आलेले आहे, त्यावरून नागरिक आपला सिबिल स्कोर काय आहे हे चेक करू शकतात.

शेतात जाण्यासाठी रस्ता हवा आहे? अशा पद्धतीने मिळवता येईल रस्ता, आत्ताच हे काम करा

अशा पद्धतीने सिबिल स्कोर चेक करा

  • सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे विचारले गेलेले संपूर्ण माहिती जस तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, लास्ट नेम, जेंडर, जन्मतारीख अशा प्रकारची माहिती भरावी लागेल.
  • त्याचप्रमाणे तुमच्या पत्त्या संबंधित काही माहिती भरावी लागेल, त्याचप्रमाणे तुमचा ईमेल आयडी टाकून राज्य आणि जिल्हा निवडा. व पिन कोड टाका.
  • जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड चे ऑप्शन निवडा, नसेल तर अदर ऑप्शन निवडून सबमिट बटनांवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा सिबील स्कोर तुमच्यासमोर ओपन होईल.

Cibil Score Check : तुमचा सिबिल स्कोर आता घर बसल्या मोबाईल वरून चेक करता येणार, अशा पद्धतीने करा सिबिल स्कोर चेक

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी इथे क्लिक करा