केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग यांच्या वतीने पुणे येथे विविध पदांकरिता भारतीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध पदांवर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून भरतीची notification जाहीर करण्यात आलेली आहे. या भारतीय अंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज हा तुम्हाला ठरवून दिलेल्या तारखेच्या आत करायचा आहे. तर चला जाणून घेऊया केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग भरती 2022 संदर्भात विस्तृत माहिती.
केंद्रीय शुल्क आणि सीमा शुल्क भरती पुणे पदांचा तपशील :
पदांचे नाव आणि रिक्त जागा:
1. कर सहाय्यक – 2 जागा
2. स्टेनोग्राफर ग्रेड II – 6 जागा
3. हवालदार – 3 जागा
वेतन: 18000 ते 81100
शैक्षणिक पात्रता: दहावी पास ते पदवीधर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2023
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
अर्ज फी: शुल्क नाही
वन विभाग भरती 2022; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर Van Vibhag Bharti 2022 Maharashtra
केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग भरती अर्ज कसा व कुठे करायचा?
CGST and Customs Bharti अंतर्गत अर्ज हा गीत पुण्यातील अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा पुणे येथील कार्यालयात करायचा असून अर्ज करण्याचा पत्ता आणि तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. या पदभरती अंतर्गत अर्ज केवळ ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर ठरवून दिलेल्या वेळेच्या आत अर्ज करायचा आहे. CGST & Customs Pune Bharti
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
सहायुक्त-मुख्य आयुक्त, केंद्र जीएसटी आणि कस्टम पुणे झोन यांचे कार्यालय, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज समोर, 41-ए, ससून रोड, पुणे-411001
वरी ऍड्रेस वर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
ऑफलाइन अर्ज कुठे मिळेल?
केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग भरती(cgst and customs bharti 2022) पुणे अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना हा आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑफलाइन अर्जाचा नमुना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा. अर्ज अचूकपणे भरा तसेच आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून वरील पत्त्यावर सादर करा.
वरील लिंक वर क्लिक करून ऑफलाइन अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्या.
भरतीची मूळ Notification:
केंद्रीय कर आणि सीमा शुल्क भरती पुणे यांच्या वतीने पदभरतीची मूळ Notification प्रकाशित करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भात मूळ जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा. या भरतीची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून घ्या.
Notification डाऊनलोड करण्याची लिंक-
उमेदवारासाठी सूचना:-
या cgst and customs bharti Maharashtra अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना अवश्य वाचून घ्याव्या.
1. ही पदभरती स्पोर्ट कोट्या अंतर्गत असल्यामुळे केवळ स्पोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा स्पोर्ट मध्ये प्रमाणपत्र मिळवलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.
2. या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा कालावधी हा केवळ दोन वर्षाचा असून ही भरती तात्पुरती स्वरूपाची आहे. ही पदभरती कायमस्वरूपी स्वरूपाची होऊ शकते.
3. या भरती संदर्भातील सर्व अटी व नियम हे केंद्रीय कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अधिकृत वेबसाईटवर आहे.
4. या पद भरती स्पोर्ट कोट्यातून असल्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी त्यांची मैदानी चाचणी घेण्यात येईल.
5. या भरती अंतर्गत अर्ज हा 2 जानेवारी 2023 या अंतिम तारखेच्या आत स्पीड पोस्टाने बंद लिफाफ्यामध्ये सादर करावा.
6. उशिरा प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
केंद्रीय कर आणि सीमा शुल्क भरती महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच जॉब विषयक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या वेबसाईटवर भेट देत राहा.