मध्य रेल्वे भरती 2022; एकूण 2422 जागांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू | Central Railway Bharti 2022

मित्रांनो मध्य रेल्वेच्या वतीने दहावी पास व आयटीआय केलेल्या उमेदवारांकरिता अप्रेंटिस या पदाकरिता 2422 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वे भरती अंतर्गत भरतीची अधिकृत notification आज प्रकाशित करण्यात आलेली असून या Central railway recruitment 2022 अंतर्गत अप्रेंटिस म्हणून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही एक मेगा भरती असून निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातच नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदाकरिता नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे.

Central Railway Bharti 2422 पदांकरिता राबविण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड या भरती अंतर्गत होणार आहे. मध्य रेल्वेच्या वतीने राबविण्यात येणारी ही Central railway recruitment प्रक्रिया मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या क्लस्टर मध्ये होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची या प्रक्रिया दरम्यान निवड होईल त्यांना वरील ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत दहावी पास तसेच बारावी पास व आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केलेला आहे त्यांना अप्रेंटिस पूर्ण करण्याची ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे.

या Central railway Bharti Maharashtra संदर्भातील एकूण जागांचा तपशील तसेच पात्रता व अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.

Central Railway Recruitment Detail :

पदांचे नाव: अप्रेंटिस

एकूण जागा: 2422

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

जाहिरात निघाल्याची दिनांक: 15 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 जानेवारी 2023

वेतन: रेल्वेच्या नियमानुसार अप्रेंटिस पदाकरिता लागू असलेले

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र(मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर इत्यादी ठिकाणी)

अधिकृत notification डाऊनलोड करा

मध्य रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता काय आहे? What is Central Railway Recruitment Educational Qualification?

मित्रांनो सेंट्रल रेल्वेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया अंतर्गत शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास उमेदवार हा दहावी पास तसेच बारावी पास व संबंधित विषयांमध्ये आयटीआय झालेला असावा.

ही Central Railway Recruitment 2023 Maharashtra अप्रेंटिस पदाकरिता असल्यामुळे खास करून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.

सेंट्रल रेल्वे भरती वयोमर्यादा:

अप्रेंटिस पदाकरिता राबविण्यात येणाऱ्या या भरती अंतर्गत वयोमर्यादा ही 15 ते 24 ठरवून देण्यात आलेली आहे. या Central railway Bharti अंतर्गत शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांकरिता पाच वर्षे शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीन वर्षे शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजेच जर ओबीसी उमेदवार असेल तर त्याचे जास्तीत जास्त वय 27 आणि मागासवर्गीय उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 29 पर्यंत चालते.

मध्य रेल्वे भरती 2022 अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply for Central Railway Recruitment 2022?

मित्रांनो या Central railway recruitment maharashtra अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक विचारलेली कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थितपणे अचूकपणे भरावा व विचारलेली कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी.

ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेबसाईटवर जाण्याची लिंक –

मध्य रेल्वे भरती अधिकृत जाहिरात Central Railway Recruitment Official Notification:

सेंट्रल रेल्वे भरती अंतर्गत धरतीची अधिकृत जाहिराती रेल्वे विभागाच्या वतीने अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत आयटीआय झालेल्या पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचून नंतरच अर्ज करायचा आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज करण्याच्या पदांविषयी माहिती तसेच इतर सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एक वेळ जाहिरात अवश्य वाचून घ्यावी.

भरती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

मित्रांनो मध्य रेल्वे विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या या भरती अंतर्गत तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. कास्ट सर्टिफिकेट

2. जन्म प्रमाणपत्र

3. दहावी आणि बारावीची गुणपत्रिका तसेच प्रमाणपत्र

4. आयटीआय प्रमाणपत्र

5. शाळा सोडल्याचा दाखला

6. व इतर प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे

वरील सर्व कागदपत्रे असल्यास आपण या भरती अंतर्गत अर्ज करण्यास पात्र असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

मध्य रेल्वे भरती निवड प्रक्रिया:

मित्रांनो या central railway bharti 2022-23 Maharashtra पदभरती अंतर्गत सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांनी या मध्य रेल्वेच्या भरती अंतर्गत अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड ही गुणोत्तराच्या आधारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड करताना दहावीच्या परीक्षेत मिळालेले मार्ग तसेच संबंधित विषयात केलेल्या आयटीआय परीक्षेतील मार्ग हे विचारात घेऊन निवड करण्यात येणार आहे. तुमचे दहावीचे आणि आयटीआयचे मार्क यानुसार तुमची निवड करण्यात येईल.

वन विभाग भरती 2022; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 

भरती अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना:

1. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आठ तास काम करावे लागेल म्हणजेच त्यांची ड्युटी आठ तासांची असेल.

2. ही पदभरती अप्रेंटिस स्वरूपाची आहे.

3. या भरती अंतर्गत उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे.

4. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपली स्वतःची माहिती अचूक द्यावी माहिती अचूक नसल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येऊ शकते.

5. या भरती अंतर्गत मिळणारा पगार हा अप्रेंटिस या पदाकरिता लागू असलेला पगार देण्यात येईल.

6. उमेदवारांनी पदभरतीची विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी व आपण ज्या पदाकरिता पात्र आहोत त्याच पदाकरिता अर्ज करावा.

Leave a Comment